आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:51+5:302021-05-14T04:27:51+5:30
बल्लारपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असताना काही दुकानदार जिल्हाधिकारी ...
बल्लारपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असताना काही दुकानदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उल्लंघन करीत कापड दुकान सुरु ठेवत आहेत. नगरपालिकेच्या पथकाने अशा दुकानावर कारवाई करून १३ हजार रु. चा दंड वसूल केला.
ही कारवाई मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
बल्लारपूर शहरात दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आहे. परंतु काही दुकानदार वेळेचे बंधन पाळत नाही व दुकाने सुरु ठेवतात. या कारवाईत जुन्या बस स्टॅन्डवरील दोन दुकानदारांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोकण्यात आला तर सहा दुकानदारांना प्रत्येकी ५०० रुपये दंड असा १३ हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस स्टेशन बल्लारपूर व नगर पालिकांच्या संयुक्त पथकाने केली.