महिला लैंगिक छळ तक्रार समिती गठीत न केल्यास ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:32 AM2021-09-17T04:32:52+5:302021-09-17T04:32:52+5:30

यावेळी पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे, पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता कांबळे, महिला ...

Penalty of Rs 50,000 for non-formation of women's sexual harassment complaint committee | महिला लैंगिक छळ तक्रार समिती गठीत न केल्यास ५० हजारांचा दंड

महिला लैंगिक छळ तक्रार समिती गठीत न केल्यास ५० हजारांचा दंड

Next

यावेळी पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे, पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता कांबळे, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, मनपाच्या सहायक आयुक्त विद्या पाटील, अग्रणी बँक जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, नियमानुसार दर तीन वर्षांनी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सदर समित्यांचे गठन झाले नाही, अशा आस्थापनांचा आढावा घ्या. कार्यालयातील समितीचे सदस्य सेवानिवृत्त किंवा इतर ठिकाणी बदली झाले असतील, तर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अंतर्गत तक्रार समितीच्या वार्षिक अहवालाचे नमुने सर्वांना पाठवून कार्यालयाकडून प्राप्त करावे, अशाही सूचना वरखेडकर यांनी सूचना केल्या.

बॉक्स

अशी असावी समिती

ज्या आस्थापनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. तिथे या समितीबाबत महिलांमध्ये जनजागृती करावी. ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे. समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून त्यात सदस्यांची नावे व मोबाइल क्रमांक नमूद करावा. या समितीत चार जणांचा समावेश असला पाहिजे.

Web Title: Penalty of Rs 50,000 for non-formation of women's sexual harassment complaint committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.