दात कशाचे; सोन्याचे, चांदीचे की सिमेंटचे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:40 PM2024-07-05T15:40:26+5:302024-07-05T15:41:56+5:30
Chandrapur : मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया असे मटेरियल वापरून दात बसवण्याचे प्रमाण वाढले
चंद्रपूर : मागील काही वर्षामध्ये सोने आणि चांदीचे भाव प्रचंड वाढले आहे. पूर्वी सोने विशेषतः चांदीचे दात बसवित होते. मात्र यामध्येही पूर्ण सोने किंवा चांदी नसायची. आता कोणीही असे दात बसवित नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया असे मटेरियल वापरून दात बसविले जातात. आता तर मूळ नैसर्गिक दाताचा रंग जसा असतो अगदी तसा दात बसवला जातो. त्यामुळे सोने, चांदी, सिमेंटच्या दातांच्या मागणीपेक्षा मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनियाचे दात अधिक बसविले जातात.
सोन्याच्या दातांचे प्रमाण घटले
■ सोन्याचे दात लावण्याची काही वर्षांपूर्वी फॅशन होती. त्यामुळे काहीजण आर्वजून असे दात बसवत होते. मात्र आता मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया अशा मटेरियलमध्ये जसेच्या तसे दात बसवून मिळतात.
■रुग्ण मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया दात बसविण्यालाच अधिक पसंती देतात. सोने, चांदीचे दात कुणीही बसवित नाही.
एका दाताचा खर्च किती
■ दात बसविताना रुग्णांना कोणत्या मेटलमध्ये दात बसवायचा, हा विषय महत्त्वाचा आहे. साइज आणि रंगानुसार दातांचा खर्च येतो.
■ विशेषतः मेटलचा दात तीन ते पाच हजार, सिरॅमिक चार ते आठ, झिरकॉनिया नऊ ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दात बसवून मिळतात.
■ हे दर कमीअधिकही असू शकतात.
■ यामध्ये कोणत्या प्रकारचा दात बसवायचा, यानुसारही दर असते.
सिरॅमिक, झिरकॉनिया दातांची मागणी
मागील काही वर्षांमध्ये दात बसविण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये मेटल, सिरॅमिक, झिरकॉनिया अशा सगळ्याच प्रकारच्या दातांना
मागणी आहे. रुग्णांना ज्या पद्धतीने आणि आर्थिक खर्चानुसार दात लावायचा त्यानुसार डेण्टिस्ट रुग्णांना दात बसवून देतात.
शारीरिक सुदृद्धत्तेसाठी दातांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दात किमान सकाळ आणि सायंकाळी ब्रशने स्वच्छ केले पाहिजे, जंक फूड, शीयपेय टाळले पाहिजे, वेळोवेळी दातांची तपासणी करावी. दातांची रचना चांगली, सरळ असावी यासाठी उपाययोजना करता येतात. सध्या सिरॅमिक, झिरकॉनिया हे दात लावणाऱ्याऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
-डॉ. श्रुती टोंगे दंतरोग, तज्ज्ञ, चंद्रपूर