लोकनृत्यातून समाजाचे दर्शन घडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:40 PM2018-12-26T22:40:21+5:302018-12-26T22:40:37+5:30

भारतीय संस्कृती अतिशय सुसंस्कृत आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. लोकनृत्यातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रेरणा मिळते. लोकनृत्यातून समाज दर्शन घडते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले.

People are seen from folk art | लोकनृत्यातून समाजाचे दर्शन घडते

लोकनृत्यातून समाजाचे दर्शन घडते

Next
ठळक मुद्देईश्वर मोहुर्ले : राजुरा येथे विद्यापीठस्तरीय लोकनृत्य स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : भारतीय संस्कृती अतिशय सुसंस्कृत आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. लोकनृत्यातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रेरणा मिळते. लोकनृत्यातून समाज दर्शन घडते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले.
विद्यापीठस्तरीय लोकनृत्य स्पर्धा राजुऱ्यात नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, न. प. अध्यक्ष अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी, प्रा. आर. डी. बारई, संचालक दौलतराव भोंगळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, प्रा. सुयोग साळवे, प्रा. संजय तारेलवार आदी उपस्थित होते.
लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, द्वितीय निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, तृतीय नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, प्रोत्साहन शिवाजी महाविद्यालय राजुरा, आदर्श कला महाविद्यालय देसाईगंज, शरद पवार महाविद्यालय गडचांदूर, विदर्भ महाविद्यालय जिवती, यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा यांनी पटकाविला. विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविक श्री शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, संचालन बादल बेले, आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले.

Web Title: People are seen from folk art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.