कोळशाच्या धुराने नागरिकांची ‘दम’कोंडी
By admin | Published: January 12, 2015 10:47 PM2015-01-12T22:47:15+5:302015-01-12T22:47:15+5:30
दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे.
दुर्गापूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे. वस्तीत सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलेले असते. या प्रदूषित वातावरणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुर्गापूर-ऊर्जानगरात वास्तव्यास असलेल्या बहुसंख्य नागरिकांकडे गॅस कनेक्शन नाही. सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक तर करावाच लागतो. स्टोव्ह पेटवावा तर वेळेवर रॉकेल मिळत नाही. स्वयंपाकाकरिता दगडी कोळसा तर मिळतच नाही. मात्र घराशेजारीच वेकोलिचे कोळशाचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर आहेत. नागरिक येथून लपून-चोरून दगडी कोळशा आणतात व सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाकरिता दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवीतात. अशा शेकडो शेगड्या पेटत असताना त्यातून प्रचंड प्रमाणात धुराचे उत्सर्जन होते.
विशेष करून हिवाळ्यात सर्वत्र धुके पसरून राहत असल्याने हा धुर आकाशात उंच उडून जात नाही. तो गावातच सर्वत्र पसरून राहतो. (वार्ताहर)