विदर्भ राज्यासाठी जनतेने एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:37 AM2019-01-11T00:37:37+5:302019-01-11T00:38:18+5:30
विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले. विदर्भ राज्याच्या निमिर्तीसाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.
यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक राम नेवले, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे विजया धोटे, पोर्णिमा बिलवे अँड. गोविंद भेंडारकर, प्रा. देविदास जगनाडे, हरिचंद्र चोले व अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. गजबे म्हणाले, सत्तेत येण्याकरिता भाजपने विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ता मिळाल्यानंतर आता दुर्लक्ष करत आहेत. विदर्भ राज्याच्या मुद्यावर विदर्भातून ४४ आमदार निवडून आणलेत. वेगळा विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावर नाही, असे सरकार सांगत आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते अखंड महाराष्ट्रकरिता विदर्भाचा विरोध केला होता.
राम नेवले म्हणाले, विदर्भाच्या मागणीकरिता आम्ही लढत आहोत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. लढ्यात सहभागी व्हावे. यावेळी युवा विदर्भ आघाडीचे तालुका अध्यक्ष सुदाम राठोड, सचिव अरविंद नागोसे, कोषाध्यक्ष अमर गाडगे, योगेश नंदनवार, तेजस गायधने, लक्ष्मण मेश्राम, निखिल डांगे, निकेश तोंडरे, ज्ञानेश्वर जोगे, सुधा राऊत, विनोद बांगरे, संदीप कामडी, क्रिष्णा कुडशिंगे, लिना जोगे, प्रज्वल वाघमारे, तुलाराम चोले, शकंर नाकतोडे, रूषी राऊत, फाल्गुन राऊत, गणेश जोगे, महेश कोलते आदी उपस्थित होते.
सरकारविरूद्ध टीकास्त्र
विदर्भ राज्य झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील. त्यामुळे मतदान करा, असे भाजपकडून निवडणूक प्रचारात सांगण्यात आले होते. विजयानंतर आश्वासनांचा विसर पडला. विकासाच्या अनेक आघाड्यांवर सरकार मागे पडले, अशी टीका विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.