जनतेने कोरोना लस घेऊन सहकार्य करावे- बंटी भांगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:58+5:302021-05-28T04:21:58+5:30
चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी व त्यावर मात करण्यासाठी २०० बेडचे गृहविलगीकरण, ५० बेड ऑक्सिजन आदी उपाययोजना सुरू ...
चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी व त्यावर मात करण्यासाठी २०० बेडचे गृहविलगीकरण, ५० बेड ऑक्सिजन आदी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे सांगत कोरोना लस घेण्याचे आवाहन आमदार बंटी भांगडिया यांनी केले
आमदार भांगडिया यांच्या माध्यमातून चिमूर येथील अभ्यंकर मैदानावरील सभागृहात ऑटो चालक मालक, मातंग समाज, नाभिक समाज बांधव यांना जीवनश्यक वस्तू किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर,खासदार अशोक नेते, भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर, डॉ. श्यामजी हटवादे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलम राचलवार, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, भाजप तालुका अध्यक्ष राजू झाडे, महिला तालुका अध्यक्ष माया ननावरे, प्रवीण सातपुते, श्याम बंग, छायाताई कंचर्लावार, निता लांडगे, भारती गोडे आदी उपस्थित होते. संचालन राजू देवतळे तर आभार जयंत गौरकर यांनी मानले .
===Photopath===
270521\173-img-20210527-wa0021.jpg
===Caption===
कार्यक्रमात उपस्थित माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर,खासदार अशोक नेते,आमदार भांगडिया