लोकांनी न घाबरता लस घ्यावी : नरेश पुगलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:34 AM2021-07-07T04:34:19+5:302021-07-07T04:34:19+5:30
फोटो बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाच्या वतीने मिलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. ...
फोटो
बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाच्या वतीने मिलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. नागपूर येथील किंग्स हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित लसीकरण शिबिराचे उद्घाटन बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते झाले.
लोकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहेत, ते पूर्णत: चुकीचे असून लस घेणे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी भीती न बाळगता लस घ्यावी, कामगार प्रतिनिधींनी त्याकरिता पुढाकार घेऊन जनजागृती करावी, असे आवाहनही नरेश पुगलिया यांनी उद्घाटनपर भाषणात केले. पेपर मिलचे युनिटहेड उदय कुकडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले. सर्व विभागप्रमुखांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. मानव संसाधन विभागप्रमुख प्रवीण शाकेर यांनी प्रास्ताविक केले. दोन दिवसात एक हजार लोकांना लस देण्याचा संकल्प असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास बिल्टचे वरिष्ठ अधिकारी गिरिराज निमा, रजत शिनाय, काँग्रेसचे नेते गजानन गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, पेपर मिल मजदूर सभेचे वसंत मांढरे, तारासिंग कलसी, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, वीरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मोहता, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली, गजेंद्र सिंह, विनोद महतो, सुनील बावणे यांची उपस्थिती होती.