स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:16 PM2019-03-13T22:16:57+5:302019-03-13T22:17:14+5:30

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.

People's participation in cleanliness campaign increased | स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देशहराचा चेहरा बदलला : किल्ला स्वच्छता, गणपती घाटाचेही सौंदर्यीकरण

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.
स्पर्धा कोणतीही असो त्या विजेते चार - पाच जण ठरतात. पण, स्पर्धेत उतरणाऱ्या सर्वांना स्पर्धेतील विषयाचा अभ्यास करावा लागतो. स्पर्धेत पुरस्कार मिळाला तरी त्यातील अनुभवाचा पुढे फायदा होतो. स्वच्छता सर्वेक्षण २०१९ स्पर्धेबाबत नेमके हेच झाले आहे. नगर परिषदच्या स्वच्छता जनजागरण कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याने लोकांचे लक्ष स्वच्छतेकडे वळले. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसर स्वच्छ राहावा, याकरिता प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मनात घाणीविषयी चीड निर्माण झाली. स्वच्छता अभियानात गाव स्वच्छ झाले. स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात जागरूकता आली. या अभियानात ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्यांची स्वच्छता झाली. गणपती घाटाचे सौंदर्यीकरण केल्याने मन प्रसन्न होते. किल्ला परिसरात दरवर्षी हिरवा कचरा उगवायचा. उन्हाळा हिवाळ्यात हा कचरा सर्वत्र पसरतो. काही ठिकाणी झाडे उगवली. त्यामुळे किल्ल्यातील बराचसा दर्शनीय भाग झाकोळला गेला होता. किल्ल्यातील विहिरीत वृक्षांनी घर केले होते. हे दृष्य आता बदलत आहे. नागरिक पुढे येत असल्याने शहरातील दुर्लक्षित प्रभागातही स्वच्छतेचा संदेश पोहोचू लागला आहे.
ऐतिहासिक किल्ल्यांचे वाढणार महत्त्व
नदी काठावरील राणी महाल ऐतिहासिक आहे. परंतु, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत इतिहासपे्रमी व्यक्त करत होते. नगर परिषदने स्वच्छता अभियानादरम्यान किल्ला स्वच्छते काम हाती घेतले. लोकसहभागातून सुमारे अडीच महिने राबून किल्ल्याला कचऱ्यापासून मुक्त केले. किल्ला परिसरात उगवलेली झाडे तोडली. स्वच्छते काम अव्याहतपणे सुरू आहे.
घाट नव्हे सहलस्थळ !
अभियानात गणपती घाटाची स्वच्छता झाली. हे घाट आता सहल स्थळ म्हणून विकसीत झाले आहे. शहरातील घरोघरी शौचालय तयार झाले. यावर्षी पुस्काराने हुलकावणी दिली. परंतु नागरिकांच्या चुकीच्या सवयी बदलल्या.

Web Title: People's participation in cleanliness campaign increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.