अभ्यासिकांमुळे वाढला स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:01:00+5:30
जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारच्या पायाभूत संस्थांची गरज असते. हाच दूरदृष्टीकोन पुढे ठेवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभ्यासिकांपासून अनेक ज्ञानात्मक संस्था सुरू केल्या. परिणामी, जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या संस्थांमधील ज्ञानात्मक उपक्रमांचा लाभ घेऊन कौशल्यवृद्धी करीत आहेत. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांच्या कालावधीत स्पर्धा परीक्षेतही जिल्ह्याचा टक्का वाढत आहे.
जिल्ह्यात पारंपरिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु, बदलत्या काळानुसार व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. अन्यथा पदवी घेऊन युवक-युवतींना रोजगारासाठी अन्यत्र भटकावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडेही विशेष लक्ष दिले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अभ्यासिक उभारण्याची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात दखलपात्र ठरली. गोंडवाना विद्यापीठात स्व. बाबा आमटे अध्यासन स्थापण्याचा निर्णय घेतला.
वेकोलिच्या सीएसआर निधीतून २२ जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ५५३ विद्यार्थिंनींना सायकलींचे वितरण केले. विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढावा, स्पर्धेत अव्वल राहावे, याकरिता शैक्षणिक उपक्रमांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला.
अभ्यासासाठी समृद्ध ग्रंथसंपदा
मिशन सेवाच्या माध्यमातून एमपीएससी, युपीएससी व तत्सम स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी विशेष उपक्रम सुरू केले. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले सैनिकी स्कूल भारतात अव्वल ठरले आहे. बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा येथे अभ्यासिका तयार करून समृद्ध ग्रंथसंपदा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले. युवक- युवती आता स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
तीन तालुक्यात सुसज्ज वसतिगृहे
मूल येथे आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहांचे बांधकाम करण्यात आले. मूल शहरात माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारून निवासाची व्यवस्था केली. मूल शहरात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी मूल-मूलींसाठी शासकीय वसतिगृहाचे बांधकाम मंजूर झाले आहे. पोंभूर्णा येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभूर्णा येथे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिंनीसाठी वसतिगृहाचे बांधकाम मंजूर केले.
३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण
पाचवी ते दहावी पर्यंतच्या ९४२ जिल्हा परिषद शाळांमधील ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना टाटा ट्रस्टमार्फत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. मिशन सेवा माध्यमातून जिल्ह्यातील २०० सार्वजनिक गं्रथालयांन १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक पुस्तके दिली. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळा घेतल्या.