जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:16 PM2019-03-12T22:16:02+5:302019-03-12T22:16:30+5:30

एमपीएससी परीक्षा कठीण असते. त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग लावावे लागतात. त्यानंतरच परीक्षा उत्तीर्ण होता येते, असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना समज आहे. परिणामी अनेकजण या परीक्षेकडे कानाडोळा करतात.

The percentage of MPSC passing percentage increased in the district | जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचा टक्का वाढला

जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचा टक्का वाढला

Next
ठळक मुद्देजिद्दीने गाठले मिशन सेवेचे यश : पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जिल्ह्यातील सहाजण उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एमपीएससी परीक्षा कठीण असते. त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग लावावे लागतात. त्यानंतरच परीक्षा उत्तीर्ण होता येते, असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना समज आहे. परिणामी अनेकजण या परीक्षेकडे कानाडोळा करतात. मात्र मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात एमपीएससी उत्तीर्णचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ही बाब स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरणारी आहे.
सर्वात कठीण परीक्षा म्हणून एमपीएससी व युपीएससी परीक्षेकडे बघितले जाते. त्यातच ग्रामीण भागात सुविधांचा अभाव, पोषण वातावरण, मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे एमपीएससी उत्तीर्णचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. मात्र जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यासाच्या भरोशावर अनेकांनी यशाचे शिखर पार करुन ग्रामीण विद्यार्थी कुठेच मागे नाही, हे सिद्ध करुन दाखविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस उपनिरिक्षक पदी कोरपना तालुक्यातील श्यामसुंदर माधवराव सूर्यवंशी हा राज्यातून सहाव्या क्रमांकावर तर विदर्भातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्यासोबतच राजुरा तालुक्यातील ओम राजा कलेगुरवार, नागभीड तालुक्यातील निखील अरविंद राहाटे, शुभांगी शंकर सेलोकर, रुपेश कुंभारे, कुमुदिनी पाथोडे यांनी पोलीस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर राम चौधरीची कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
यापूर्वी नागभीड येथील राहुल फटिंग, राहुल गावंडे यांचीसुद्धा एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली होती. तर सन २०१७-२०१८ मध्ये लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेमध्ये कोरपना येथील निलेश मालेकर, धीरज कोटरंगे, गोंडपिपरी तालुक्यातील राळेपेठ येथील पुरुषोत्तम पिंपळशेंडे यांची४१ वी रॅक पटकावित एसटीआयपदी निवड झाली. तर अनुप भोयर विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. मूल येथील युगंधरा महाजनवार हिने मागील वर्षी घेतलेल्या उत्पादन शुल्क निरिक्षक पदाच्या परीक्षेत एनटीबी महिला प्रवर्गातून प्रथम तसेच कर सहाय्यक परीक्षेतसुद्धा एनटीबी प्रवर्गातून प्रथम आली होती.
येथील निलीम दुधे यांनेसुद्धा कर सहाय्यक परीक्षेत अनुसुचित जातीतून १७ वे स्थान पटकाविले होते. तर वरोरा तालुक्यातील आव वडगाव येथील विनोद भोयर यांनेसुद्धा करसहाय्यक म्हणून निवड झाली होती.
ग्रामीण भागातील अनेक युवकांनी जिद्दीने एमपीएसएसी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
शासनाने मार्गदर्शन केंद्र सुरू करावे
शहरामध्ये स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणारे विविध शिकवणी वर्ग आहेत. मात्र ग्रामीण भागात अशी कोणतीही सुविधा नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये परीक्षेबाबत विविध संभ्रम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांसाठी शासनाने मार्गदर्शन केंद्र सुरु करावे, तसेच सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याºया युवकांकडून होत आहे.
प्रेरणा घेण्याची गरज
चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी स्वत: जिद्दीने अभ्यास करुन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याच्यापासून प्रेरणा घेत मनातील स्पर्धा परीक्षेसंदर्भात असलेले गैरसमज दूर करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

Web Title: The percentage of MPSC passing percentage increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.