विद्यार्थ्यांनी केले कौशल्याचे प्रदर्शन
By admin | Published: November 30, 2015 12:59 AM2015-11-30T00:59:29+5:302015-11-30T00:59:29+5:30
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे इदु-फिस्ट-२०१५ चे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याकरिता चांदा पब्लिक स्कूल येथे इदु-फिस्ट-२०१५ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक, वैज्ञानिक, गणितीय, साहित्यिक इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांना ज्या विषयात आवड आहे, त्यात तो विद्यार्थी पुढे जावा असाच नेहमी शाळेचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हे फक्त स्पर्धेसाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस मुख्य अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजा बोझावार हे तर शाळेच्या संचालिका स्मिता संजय जीवतोडे तसेच प्राचार्या भावना व्ही.एस. हे उपस्थित होते. संदीप दिवान यांनी सांगितले की, चारी सदनांची नावे ऐकून ते आश्चर्यचकीत झाले व त्यांनी आचार्य चाणक्य, महर्षी वेदव्यास, महर्षी चरक, महर्षी पाणीनी या महान व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकला व आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने स्वत:ला व देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक व्यक्तीने देशाच्या प्रगतीला आपला हाभतार लावावा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे, अशोक कांबळे, विजय साळसकर तसेच शिपाई तुकाराम ओंबाले यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केले. आभार अंजली बंडावार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)