नाशिवंत होणारा भाजीपाला व फळे अधिक काळ टिकण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:32 AM2021-08-25T04:32:38+5:302021-08-25T04:32:38+5:30
टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत ...
टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजीपाल्याच्या दराविषयी धोरण ठरवावे. शेतकऱ्यांना न्याय दयावा, अशी विनंती मूल येथील भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ना. भुसे यांनी भाजीपाला उत्पादकांची कैफीयत ऐकून घेतली. भाजीपाल्याचे दर कमी असल्याचे मान्य करताना एमआरपीअंतर्गत भाजीपाल्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने योजना हाती घ्यावी, याकडेही त्यांचे लक्ष वेधले. यावेळी उत्पादकांच्या अडचणी समजून घेतल्या.