३७५ दुर्गा मंडळांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:29 PM2018-10-09T22:29:07+5:302018-10-09T22:29:42+5:30

दूर्गा उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील दूर्गा मंडळाने केलेल्या अर्जांपैकी केवळ ३७५ दूर्गामंडळाला सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. एक दिवसावर उत्सव येऊन ठेपला असूनही मंडळांनी अजूनही परवानगीसाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे मंडळानी त्वरीत आॅनलाईन अर्ज करावे, असे आवहन धर्मदाय कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Permission to 375 Durga Mandals | ३७५ दुर्गा मंडळांना परवानगी

३७५ दुर्गा मंडळांना परवानगी

Next
ठळक मुद्देआॅनलाईन नोंदणीकडे मंडळाची पाठ : नवरात्री उत्सवाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दूर्गा उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील दूर्गा मंडळाने केलेल्या अर्जांपैकी केवळ ३७५ दूर्गामंडळाला सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. एक दिवसावर उत्सव येऊन ठेपला असूनही मंडळांनी अजूनही परवानगीसाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे मंडळानी त्वरीत आॅनलाईन अर्ज करावे, असे आवहन धर्मदाय कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
गणेश व दुर्गात्सवासाठी सार्वजनिक गणेश व दुर्गा मंडळांना सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह आॅनलाइन नोंदणी करावी लागते. परवानगीसाठी मंडळाला जागेची परवानगी, विद्युत वितरण कंपणीची परवानगी, वर्गणी गोळा करण्याचे सर्व कागदपत्र कार्यालयात जमा करावे लागतात. या सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर सहायक धर्मदाय आयुक्त त्या मंडळाला परवानगी देतात. मागील वर्षी अश्विन नवरात्रीच्या आदल्या दिवशी ६५० मंडळाना परवानगी दिली होती. दरवर्षी ७०० च्या जवळपास दूर्गामंडळ परवानगीसाठी अर्ज करीत असतात. नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु असते. सद्यस्थिती ३७५ दूर्गा मंडळांना परवानी दिल्याची माहिती कार्यालयातील अधीक्षक व सूचना अधिकारी पी. जे. राय यांनी दिली.
मंदिरात अखंड मनोकामना ज्योत
नवरात्रीचे औचित्य साधून शहरातील अनेक मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी रास गरबा, दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगाली कॅम्प परिसरातील मॉ काली मंदिरमध्ये महापूजा व रास-गरबाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात
चंद्रपुरात गणेश उत्सव, दूर्गा उत्सव व शारदा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असतो. अश्विन नवरात्रीला सुरु होणाऱ्या दुर्गाउत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मातेच्या आगमणासाठी मंडळाच्या सदस्य मोठ्या जोमात तयारी करीत आहेत. तर मुर्तीकारांनी मूर्तीला पूर्णरुप दिले असून केवळ श्रृंगार शिल्लक असल्याची माहिती मूर्तीकारांनी दिली.

Web Title: Permission to 375 Durga Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.