नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:30+5:302021-08-15T04:28:30+5:30

पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल घुग्घुस : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध घुग्घुस ...

Persecution of newlyweds for dowry; Filed a case against husband and mother-in-law | नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Next

पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल

घुग्घुस : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घुग्घुसच्या पायलचा विवाह काही महिन्यांपूर्वी रितरिवाजाप्रमाणे पार पडला. त्यानंतर काही दिवसांनी पती व सासूने तिला दीड लाख रुपयांची मागणी करून सातत्याने शारीरिक व मानसिक छड करणे तसेच मारहाण करणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून पायलने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती व सासू विरुद्ध ४९८, (अ) ३२३, ५०४ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बंडू मोरे करीत आहेत.

Web Title: Persecution of newlyweds for dowry; Filed a case against husband and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.