कीटकनाशके निघाली भ्रष्ट, धानपिक नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:06 AM2017-11-04T00:06:20+5:302017-11-04T00:06:31+5:30
तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकदा विविध औषधांची फवारणी करूनही धानपिक हातातून गेल्याने कीटकनाशके निघाली भ्रष्ट आणि धानपिक झाले नष्ट, अशी शेतकºयांची ओरड सुरू आहे.
याबाबत परिसरातील अनेक शेतकºयांनी तहसीलदार टेंबेकर यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी लेखी निवेदन दिले आहे. त्यानुसार तालुका परिसरातील शेतकºयांच्या बांधावर कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण करणे सुरू असून शुक्रवारी देवाडा खुर्द येथे कृषी सहाय्यक राठोड यांच्यासमवेत अनेक शेतकºयांनी परिसरातील नष्ट झालेले धानपीक दाखविले आणि तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
धान पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील परिसरामध्ये यावर्षी तुरळक पाऊस पडला. तरीही धानपिक चांगल्या स्थितीत होते. मात्र धानपीक गर्भाशयात असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी विविध प्रकारची महागडी औषधे विकत घेऊन फवारणी केली. मात्र अनेक प्रयत्नानंतरही रोग नियंत्रणात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.
हाती आलेले धानपिक जावू नये यासाठी प्रत्येकांनी जीवाची पर्वा न करता पाठीवर सारखा पंप घेऊन फवारणी केली. त्यांच्या या परिश्रमाला काही प्रमाणात यश सुद्धा आले. त्यामुळे बेरड, करपा, लाल्या आदी रोग नियंत्रणात आणता आले. काही प्रमाणात तग धरून असलेले धानपिक हाती येण्याची शक्यता होती. परंतु तग धरून असलेल्या धानपिकाला मावा तुडतुडा या भयंकर रोगाने ग्रासल्याने नानाविध प्रकारची औषधी फवारणी करून सुद्दा या रोगाला नियंत्रणात आणने कठीण झाल्याने अखेर परिसरातील शेतकºयांचे धानपिकाचे तणसात रूपांतर झाले आहे.
या पिकाची कापणी करून जनावरांना चारा टाकणे सुद्धा कठीण झाले आहे. देवाडा खुर्द येथील शेतकरी गणपती स्पतरे यांनी तर फवारणी करताना घरी आले आणि चिंतेने बेहोश पडले. त्यांना येथील शेतकºयांनी चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. पाच-सात दिवसानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्याची सुट्टी करून आणल्यानंतर आजही त्याच्या डोळ्यासमोर धानपिकाचे वाईट चित्र दिसत असल्याने ते धानपिक गेले, असे सारखे वेड्यासारखे बळबळत असतात. ते कुणालाही ओळखत नाही, अशी अवस्था झाली आहे.
शेतकºयांचा जीव मेटाकुटीला
सावली : तालुक्यातील धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकरी औषधांची फवारणी करता करता हवालदिल झाले आहेत. या वर्षीच्या उष्ण व दमट हवामानामुळे आणि अत्यल्प पावसामुळे धान पिकाला अपेक्षीत असे पोषक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे धानावर येणाºया बहुतेक सर्वच प्रकारच्या रोगाने तोंडवर काढले असून दर आठ-दहा दिवसात वेगवेगळ्या प्रकारची कीड आणि रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. धान परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच विविध रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले पीक नष्ट होण्याची भीती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे. पाने गुंडाळणारी अळी, खोड कीडा, मावा, तुडतुडा, मानमोडी यासारखे असंख्य रोग धानावर येत असल्याने कृषी विभागही हतबल झाला आहे. तर औषधांची फवारणी करता करता शेतकरीही तंगून गेले आहेत. आसोलामेंढा तलाव आणि गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर शेतकºयांनी मोठ्या आशेने रोवणी आटोपली. प्रसंगी खासगी कर्ज व उसनवार घेऊन रोवण्याचे काम केले. मात्र धानाला विविध रोगाने पछाडल्याने शेतकºयांपुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना न्याय देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.