पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:35 AM2019-07-28T00:35:33+5:302019-07-28T00:35:58+5:30

वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत.

Petrol, diesel prices continue to rage | पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संताप

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांमध्ये संताप

Next
ठळक मुद्देसर्वसामान्यांना भुर्दंड । सात महिन्यांमध्ये लिटरमागे पाच रुपयांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोलडिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होत असून महागाईची झळही बसत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता प्रत्येकांकडे वाहन आले आहे. प्रत्येक जण आपले काम त्वरित व्हावे यासाठी वाहनांचा बेसुमार वापर करीत आहेत. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. दळणवळणाची साधने म्हणून चारचाकी वाहनांची संख्या आणि मालवाहू वाहनांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात यावरुन वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल किती महत्त्वाचे आहे. हे लक्षात येते. या इंधनाच्या किंमतीत दरवाढ झाल्याने भाडेवाढ आणि प्रवासदर वाढीला पुढील काळात सामोरे जावे लागण्याचा धोका वर्तविला जात आहे. यातून सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.
पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये थोडी जरी वाढ झाली तरी मोठे आंदोलन केले जात होते. आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या तरी पाहिजे तसे आंदोलन होताना दिसत नाही. जानेवारी २०१९ मध्ये पेट्रोलचे दर ७५ रुपये ४७ पैसे होते. जुलैमध्ये हे दर लिटरमागे ८० रुपये १२ पैशांवर पोहचले आहे. लिटरमागे ४ रुपये ६५ पैशांची वाढ नोंदविली गेली आहे. अशीच अवस्था डिझेलची आहे. जानेवारीमध्ये डिझेलचे दर ६५.७१ पैसे होते. हे दर आता ६९.४० पैसे झाले आहेत. यामध्ये लिटरमागे ३.६९ पैशांची वाढ नोंदविण्यात आली आहे. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य वाहनधारकां रोष व्यक्त केला जात आहे. मात्र कोणीही यावर बोलायला तयार नाही. अनेक जण तर आपले काम करण्यामध्येच व्यस्त आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून दिलासा देणे गरजेचे आहे.

अन्याय केल्याचा प्रश्नच नाही
अनेकवेळा ग्राहक लिटरप्रमाणे पेट्रोल न मागता १००, २०० च्या प्रमाणात पेट्रोलची मागणी करतात. यामुळे पेट्रोलचे दर कमी किंवा जास्त झाले याचा त्यांना अंदाजच येत नाही. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांनी जर पेट्रोल भरतांना लिटर प्रमाणे पेट्रोल भरल्यास दरवाढ झाल्याचे लक्षात येईल. एवढेच नाही तर दरवाढीविरुद्ध आवाज उठविणेही गरजेचे आहे.

Web Title: Petrol, diesel prices continue to rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.