पेट्रोल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:13 PM2018-09-03T23:13:28+5:302018-09-03T23:14:07+5:30
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी दुपारी १ वाजता गांधी चौकात गॅस-सिलेंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी दुपारी १ वाजता गांधी चौकात गॅस-सिलेंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, प्रदेश सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे यांनी केंद्र व राज्य सरकारने गॅस सिलेंडरचे दर वाढविल्यामुळे जंगलाची कत्तले होतील, चुल पेटल्यामुळे प्रदूषण वाढेल, मोल मजुरी करणारा मंजूर, शेती करणारा शेतकरी वर्षाला ५० ते ६० हजार रुपये कमवतील इतक्या महागाईत पेट्रोल-डिझलच्या दरवाढीमुळे घाऊक वस्तूंचे भाव वधारलेले आहे. महिन्याचे पाच हजार रुपये कमवणारा माणूस मुलांचा शिक्षणाचा खर्च, त्यांचा आरोग्याचा खर्च, विद्युत बिलाचा खर्च, घर टॅक्स, ९१५ रु. सिलेंडर इतक्या महागाईत घर कसे चालवणार आहे. काँग्रेसचे सरकार असताना गॅसचे दर ४०० रुपये होते. आता ते दर ९१५ रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे भारत सरकारने आयात केलेल्या तेलाला शुद्ध करुन दुसऱ्या देशााला ३५ ते ४० रु. लिटर प्रतीमध्ये भारत सरकार देत आहेत आणि देशवासियांना पेट्रोल- डिझेल ७८ रु व ८० रु. मध्ये घ्यावे, लागत आहे. देशातील जनतेचे हे शोषण आहे. असा आरोप शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला.
निदर्शन आंदोलणाप्रसंगी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे, शिवा राव, अॅड. मलक शाकीर, विनोद सकत, प्रा. अनिल शिंदे, अॅड. भास्कर दिवसे, शालीनी भगत, सुनीता अग्रवाल, सचिन कत्याल, नगरसेवक अमजद अली, धनवलकर, फारुक सिद्धकी, मोहन डोंगरे, हरिदास लांडे, चंद्रमा यादव, राजा काझी, राजू दास, हरिदास डाखरे, राजेश अडूर, सुरेश आत्राम, बंडोपंत तातावार, दीपक कटकोज वार, राजू दास, हरीदास डाखरे, राजेश अडूर, सुरेश आत्राम, बंडोपंत तातावार, दीपक कटकोजवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने
चंद्रपूर : केंद्रा व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलची सतत भाववाढ होत असून यामुळे जनसामान्याचे हाल होत आहे. असा आरोप करुन वरोरा नाका चौक परिसरात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाडीविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार बाळासाहेब साळुंखे, अॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दीपक जैस्वाल, ज्योती रंगारी, मंगला आखरे, बाबुराव गेडाम, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तालुका व शहर अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.