१६ वर्षांपासून पीएफच भरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:36+5:302021-02-08T04:24:36+5:30

वाहनचालकांची तक्रार : गोपानी आयरन ॲण्ड पॉवर कंपनीचा प्रताप वतन लोणे घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील ...

PF has not been paid for 16 years | १६ वर्षांपासून पीएफच भरला नाही

१६ वर्षांपासून पीएफच भरला नाही

Next

वाहनचालकांची तक्रार : गोपानी आयरन ॲण्ड पॉवर कंपनीचा प्रताप

वतन लोणे

घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्यातील वाहनचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या प्रकरणाची ऑनलाइन तक्रार करण्यात आल्यानंतर आता पीएफ विभाग काय कारवाई करणार, याकडे कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.

ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्यात चंद्रप्रकाश डहाट व अशोक कोटा हे मागील अंदाजे १६ वर्षांपासून तर जालिंद्र ऊर्फ जितू दुर्गे हे मागील १० वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून वाहनचालक (ड्रायव्हर) या पदावर कार्यरत आहेत. मात्र आजतागायत कारखान्याने या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच नाही. कर्मचा-यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा पीएफ भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. मात्र आता या प्रकरणाची रितसर तक्रार करण्यात आल्यामुळे पीएफ विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, कारखान्यात चार वाहनचालक कार्यरत होते. मात्र चवथा वाहनचालक काही महिन्यांपूर्वीच नोकरी सोडून गेला. नंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. न्याय व हक्क मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उर्वरित तीनही चालकांनी दिले. सोबतच ऑनलाइन तक्रारीला जोड म्हणून पीएफ कपात होत नसल्याची स्वतःची लेखी तक्रारही वाहनचालकांनी दिली आहे.

Web Title: PF has not been paid for 16 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.