फे रो अलॉय प्लान्टमधील ३८५ कंत्राटी कामगारांना वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:22 PM2017-07-30T23:22:58+5:302017-07-30T23:23:31+5:30
फेरो अलॉय प्लान्टमध्ये मागील २५ वर्षाहून अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फेरो अलॉय प्लान्टमध्ये मागील २५ वर्षाहून अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या अस्थायी कंत्राटी कामगारांच्या वेतन वृध्दीबाबतचा प्रलंबित प्रश्न केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने अखेर मार्गी लागला असून येत्या १ आॅगस्टपासून या कंत्राटी कामगारांना मिळणाºया मासिक वेतनात वाढ करण्यात आली आहे. याबरोबरच अन्य सुविधासुध्दा या कामगारांना प्राप्त होणार आहे. सदर आकुशल कामगारांना अर्धकुशल कामगारांचा दर्जा देण्याबाबतही निर्णय २७ जुलै रोजी प्रादेशिक कामगार आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या वेतन समझोत्या संदर्भातील बैठकीमध्ये झाल्याने या कामगारांनी ना. हंसराज अहीर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.
फेरो अलॉय प्लान्टमधील ३८५ कंत्राटी कामगारांना वेतनवृध्दी मिळण्याकरिता चंद्रपूर फेरो अलॉय प्लॅन्ट मजदूर युनियनद्वारा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्या अनुषंगाने ना. अहीर यांनी प्रादेशिक श्रम आयुक्त नागपूर यांना कामगार युनियनचे प्रतिनिधी तसेच फेरो अलॉय प्लॅन्टचे प्रबंधनासह बैठकीचे आयोजन करून वेतन वृध्दीचा तिढा सोडविण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानूसार २७ जुलैलक वेतन समझोत्याकरिता प्रादेशिक श्रम आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीत स्वत: आर.एल.सी. तरूण कुमार सिंग, चंद्रपूर फेरो अलॉय प्लॅन्टचे उपमहाप्रबंधक राकेश कुमार शर्मा, पी. पी. चक्रवर्ती तसेच सी. एफ. ए. प्लॅन्ट मजदूर युनियनचे महासचिव किसन साहू, उपाध्यक्ष अर्जुन तिवारी व कार्याध्यक्ष शंकर बुटले, यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत कंत्राटी कामगारांच्या वेतनवृध्दीबाबत लेखी करार करण्यात आला. तसेच या बैठकीत या कामगारांच्या वेतनवृध्दी बरोबरच अन्य सुविधाबाबत ही निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कामगारांना कॅन्टीन सुविधा, सायकल भत्ता, रात्रपाळी भत्ता, याबाबत स्थानिक पातळी वरून येत्या २ महिन्यांत निर्णय घेतला जाईल असेही या समझोत्याद्वारे फेरो अलॉय प्लॉट व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
ना. अहीर यांच्या सुचनेनुसार केंद्र सरकारच्या न्युनतम वेतन कायद्यानुसार या अस्थायी कंत्राटी कामगारांना अर्धकुशल कामगाराचा दर्जा देण्याचा निर्णयसुध्दा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अनेक अधिकारी उपस्थित होते. त्याच्या उपस्थितच सदर निर्णय घेण्यात आला.
वेतनवृध्दी तसेच विविधांगी सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यशस्वी मध्यस्थी करून प्रदीर्घ कालावधीपासून कार्यरत फे रो अलॉय प्लान्टच्या या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याबद्दल कामगारांनी गृहराज्यमंत्री अहीर यांच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी मजदूर युनियनचे पदाधिकारी किसन साहू, अर्जुन तिवारी, शंकर बुटले, राजू सातपूते, प्रमोद अतकरे, दामोधर मेघे, सुखदेव अंबादे, राजू ढवळे, पंतलाल यादव, दिवाकर दोडेवार, योगदाज पारधी, मनोज सिंह, रमणी हलदर, श्रीकांत मुडे, देवमन वानखेडे, सुनिल दांडेकर उपस्थित होते.