महाराष्ट्राच्या प्रगतीवर छायाचित्र स्पर्धा

By admin | Published: June 28, 2017 12:53 AM2017-06-28T00:53:25+5:302017-06-28T00:53:25+5:30

महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे, यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर ....

Photo Competition on the progress of Maharashtra | महाराष्ट्राच्या प्रगतीवर छायाचित्र स्पर्धा

महाराष्ट्राच्या प्रगतीवर छायाचित्र स्पर्धा

Next

प्रदर्शन भरणार : माहिती व जनसंर्पकचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे, यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा मंगळवारी जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पधेर्साठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये, १५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल. तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पधेर्साठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी ‘महा. फोेटो०१ @जीमेल.कॉम या संकेतस्थळावर १५ जुलैपर्यंत छायाचित्र पाठवावे. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव,संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र १८ बाय ३० इंच एचडी (हाय रिझोल्यूशन) असावेत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा, अशी माहिती समन्वयक सहायक संचालक (माहिती) सागरकुमार कांबळे यांनी दिली.

Web Title: Photo Competition on the progress of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.