छायाचित्रकारांनी केली ‘नूर’ लघुपटाची निर्मिती
By admin | Published: September 19, 2016 12:50 AM2016-09-19T00:50:11+5:302016-09-19T00:50:11+5:30
मानव व प्राणी यांच्या हल्ल्यांच्या संबंधावर आधारित ‘नूर’ या लघुपटाची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात,...
मानव व प्राणी यांच्या हल्ल्यासंबंधांवर आधारित चित्रपट
राजू गेडाम मूल
मानव व प्राणी यांच्या हल्ल्यांच्या संबंधावर आधारित ‘नूर’ या लघुपटाची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात, गावात असणाऱ्या छायाचित्रकारांनी एकत्र येऊन केली आहे. या लघुपटाचे चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात नुकतेच पूर्ण झाले असून छायाचित्रकारांनी निर्माण केलेला हा एकमेव लघुपट असल्याचे बोलले जात आहे.
‘नूर’ या लघुपटाची निर्मिती छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था व हॉरिझन एंटरटेनमेंट, चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रम असून या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत. सध्या ते मुंबईत विविध मालिका, लघुपट आदी करण्यात अग्रेसर आहेत.
या लघुपटात अवनी, शिंगरु, सीपल, तामगडे, सचिव गिरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सदर लघुपट निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील छायाचित्रकार नंदकिशोर सोनारकर, नितीन रायपुरे, सचिन वाकडे, धीरज शेंडे, योगेश मांदाडे, फुलचंद मेश्राम, प्रेम रायपुरे, पवन प्रसाद, लोमेश पिल्लेवार, सुशांत चिकाटे, वतन ब्राह्मणे, अतुल रामटेके, सुशांत रायपुरे, गंगा भांडेकर, आनंद खंडाळे, विशाल खोब्रागडे, पंकज हांडे, अजय लिहितकर, तेजराम चिकटवार, किशोर श्रीरामवार आदींनी पुढाकार घेतला.
‘नूर’ या चित्रपटाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात सांस्कृतिक व कला क्षेत्रात नव्या पर्वाला प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल , असा आशावाद व्यक्त केला जात आहे.