चंद्रपूर, नागपूर, अकोला, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:54 PM2018-08-27T22:54:52+5:302018-08-27T22:55:15+5:30
पॉवरसिटी फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी तब्बल पाचशेवर छायाचित्र प्रदर्शनात स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. यात चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांनी पुरस्कार पटकाविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पॉवरसिटी फोटोग्राफर क्लबच्या वतीने स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. यावेळी तब्बल पाचशेवर छायाचित्र प्रदर्शनात स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. यात चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांनी पुरस्कार पटकाविला.
तीन दिवसीय प्रदर्शनीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी केंद्रीय अर्थमंत्री शांताराम पोटदूखे, जिल्हाधिकारी डॉ. खेमनार, पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे भागवत, त्रिवेदी, विजय बदलख, बंडू लडके, मनोज टहलियानी, सुनील राव, जि. प. सभापती ब्रिजभुषण पाझारे, आदींनी प्रदर्शनाला भेट दिली. वेडिंग, वाईल्ड लाइफ आणि हौशी छायाचित्र अशा तीन गटात हे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी जगप्रसिध्द छायाचित्रकार बैजू पाटील यांनी छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. यावेळी नागपूरचे शेखर सोनी, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, माजी नगरसेवक संजय वैद्य, राजू जोशी , आयोजक गोलु बाराहाते, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते.
नेचर व वाइल्ड गटात अनिकेत लुनावत चंद्रपूर, राहूल कुचनकर, कोलपूरचे ज्ञानेश्वर वैद्य यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.
हौशी गटात ठाण्याचे प्रकाश पराडकर, चंद्रपूरचे नारायण कुंभारे, नागपूरचे अमित दत्ता यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार पटकाविला. वेडिंग गटात अकोला येथील विजय मोहरील, चिचपल्ली येथील सुमित साखरे, नागपूरचे कुणाल चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.
संचालन प्रा. श्याम हेडाउ प्रास्ताविक व्यंकटेश नरखेडकर यांनी मानले. यावेळी अमोल मेश्राम, विशाल वाटेकर, टिंकू खाडे, शशांक मोहरकर, राहूल चिलगीलवार, रोहित बेलसरे, प्रशिक पडवेकर, नीतिन टहलानिया, अतुल कोतरीवार, परिक्षित केदारपवार, मयुरी टेकाम आदी उपस्थित होते.