पिकाला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:23 AM2017-12-04T00:23:59+5:302017-12-04T00:25:00+5:30

धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.

Picla fire | पिकाला लावली आग

पिकाला लावली आग

Next

आॅनलाईन लोकमत
नागभीड : धानपीक कापणी आणि मळणीला परवडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर एका शेतकºयाने अतिशय जड अंतकरणाने संपूर्ण तीन एकर शेतालाच आग लावून दिली.
चंद्रशेखर मारोती मेश्राम असे त्या शेतकऱ्याचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील वलनी येथील रहिवासी आहे. मेश्राम यांना दहा एकर शेती असून या शेतीत यावर्षी धानाचे पीक घेतले होते. पिकाची या शेतकऱ्याने पोटच्या गोळ्यासारखी काळजी घेतली.
एवढेच नाही तर एकरी १२ हजार याप्रमाणे मेश्राम यांनी ३६ हजार रुपयेसुद्धा खर्च केले. मेश्राम यांच्या या मेहनतीचे फलीत म्हणून पीकही जोमात आले. या पिकाच्या भरवशावर सदर शेतकरी उद्याची स्वप्नं रंगवित असताना आणि धान पीक अंतिम टप्प्यात आले असतानाच या पिकावर मावा व तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. या रोगांनी मेश्राम यांची शेती एवढी प्रभावित झाली की तीन एकरातील संपूर्ण धान पीक नष्ट झाले. शेवटी हताश झालेल्या मेश्राम यांनी शेतातील धान पीक स्वत:च आग लावून जाळून टाकले.
धान्याऐवजी रोख
अगदी मागील वर्षीपर्यंत शेतातील धानाची कापणी आणि मळणी धान्याच्या मोबदल्यात करण्यात येत होती. त्याचे दरही ठरलेले होते. पण यावर्षी कापणी करणाºया मजुरांनी आणि मळणी करणाºया मशीनचालकांनी शेतातील धान पिकाची अवस्था लक्षात घेऊन यात बदल केला असून एकराप्रमाणे रोखीने काम करीत आहेत.

Web Title: Picla fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.