कोल्हापुरी बंधाऱ्याचे खांब ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:52 PM2019-06-27T22:52:34+5:302019-06-27T22:53:07+5:30

सतरा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा खांब कोसळल्याचा प्रकार राजुरा शिवारात उघडकीस आला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपयाचे सिमेंट बंधारे निकामी होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

The pillars of the Kolhapuri Bandhas collapsed | कोल्हापुरी बंधाऱ्याचे खांब ढासळला

कोल्हापुरी बंधाऱ्याचे खांब ढासळला

Next
ठळक मुद्देराजुरातील प्रकार : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नाराजी

बी.यू. बोर्डेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : सतरा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा खांब कोसळल्याचा प्रकार राजुरा शिवारात उघडकीस आला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपयाचे सिमेंट बंधारे निकामी होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
राजुरा शिवारात असलेल्या बंधाºयाच्या या बांधकामाचा एक खांब कोसळल्याचा धक्कादायक प्रकार राजुका घडला. त्यामुळे संबंधित अभियंत्याची भूमिका संशयाच्या भोवºयात आहे.
शहरालगतच्या पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या एका नाल्यात जिल्हा परिषद सिंचन विभागाने विदर्भ संधान सिंचन योजनेंतर्गत ११ पिल्लरचा कोल्हापुरी बंधारा बांधला. या बंधाऱ्याच्या माध्यमातून परिसरात सिंचनाची सुविधा होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा होती. यासाठी १७ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. पण बांधकाम सुरू असताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले आणि हेच कंत्राटदाराला फायद्याचे ठरले. या बंधाऱ्यांचे दोन ते तीन खांब बाहेर निघाले आहेत. लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. पहिल्याच पावसात गिट्टी उखडल्याने कामाचा निकृष्टपणा समोर आला आहे. बांधकामातील तांत्रिक बाजू धाब्यावर बसवून अंदाजपत्रकातील नमूद दिशानिर्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे बंधाºयाचा खांब कोसळण्याचा प्रकार घडला. बंधाºयाच्या बांधकामात लाखोंच्या निधीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

Web Title: The pillars of the Kolhapuri Bandhas collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.