पिंपळगाव येथे आगीत तीन घरे खाक

By admin | Published: April 15, 2017 12:39 AM2017-04-15T00:39:28+5:302017-04-15T00:39:28+5:30

नजीकच्या पिंपळगाव येथील तीन घरांना विद्युत शॉट सर्कीटमुळे शुक्रवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असून कोसरे कुटुंब उघड्यावर आले आहे.

In Pimpalgaon, there are three houses in the fire | पिंपळगाव येथे आगीत तीन घरे खाक

पिंपळगाव येथे आगीत तीन घरे खाक

Next

लाखोंचे नुकसान : साहित्यासह अन्नधान्य जळाले
शंकरपूर : नजीकच्या पिंपळगाव येथील तीन घरांना विद्युत शॉट सर्कीटमुळे शुक्रवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असून कोसरे कुटुंब उघड्यावर आले आहे.
दुपारी १.३० वाजता पिंपळगाव येथील आत्माराम कोसरे यांच्या घराबाहेर असलेल्या विद्युत मीटरमधून ठिणगी उडून लागून असलेल्या गवताच्या मांडवावर पडली. त्यामुळे मांडवाने पेट घेतला. ही आग आत्माराम यांच्या घराला लागली. त्यानंतर लगतच्या दुर्योधन कोसरे व देवकाबाई कोसरे यांच्या घराला लागली. आगीने उग्र रूप धारण करून तिन्ही घरे खाक झाली. गावातील सर्व नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तिन्ही घरातीले दागिने, अन्नधान्य, मुद्देमाल, एक बकरा, कपडे, टी.व्ही. संच व इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. (वार्ताहर)

आगीत बैल होरपळला
वरोरा : येथून नऊ कि.मी. अंतरावरील पावणा येथील मधुकर राजूरकर यांच्या शेतात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता लागलेल्या आगीत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. त्यात शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मधुकर राजूरकर सकाळी शेतातील कचरा पेटविण्यास गेले होते. कचऱ्याला लावलेली आग विझवून घरी पोहचले. मात्र आग पूर्णता: विझली नाही, हे त्यांना कळलेच नाही. त्यातील आगीने शेतातील मांडवाला कवेत घेतले. त्या मांडवातील बैलजोडीपैकी एका बैलाचा मृत्यू झाला. एक बैल सुदैवाने वाचला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In Pimpalgaon, there are three houses in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.