पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:24 AM2017-10-18T00:24:20+5:302017-10-18T00:24:31+5:30
स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वनसडी : स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली. नागभीड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांच्या नेतृत्वात सदर चमूने भेट दिली.
यावेळी सर्वप्रथम पिपर्डा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, ग्रामसफाई , हागणदारीमुक्त गाव, शौचालय वापर, देखरेख याची माहिती त्यांनी जाणून घेतली. गावातील पाणी वार, पाणी शुध्दीकरण, सांडपाणी निचरा, शौचखड्यात वाया जाणाºया पाण्याची साठवणूक, कचरा व्यवस्थापनासह गावात सुरू असलेली विकासकामे याची माहिती जाणून घेतली. शाळा, अगंणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रातील सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. गावातील अनेक कुटुंबीयाशी संवाद साधला. यावेळी सहायक संवर्ग विकास अधिकारी साळवे,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी हजर होते. पिपर्डा ग्रामपंचायतीने २०१६-१७ या सत्रात स्पर्धेत भाग घेतला. पंचायत समिती स्तरावर दुसरा क्रमांक ग्रामपंचायतीने प्राप्त केला. ग्रामसेवक परसुटकर यांनी विकासकामाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक आबिद अली यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रभान तोडासे, रमेश डाखरे,विठ्ठल कुचनकर,प्रेमा राठोड, मीनाक्षी डाखरे, कांता गोरे उपस्थित होते.