कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:16+5:30
बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा-कोरपना तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
राजुरा तालुक्यात २४ हजार ३९६ हेक्टर आणि कोरपना तालुक्यात २९ हजार १९५ हेक्टर जमिनीवर कापसाचा पेरा आहे. परतीचा पाऊस, अतिवृष्टी अशा संकटातून पिकांचे रक्षण केले. मात्र आता शेतकऱ्यांवर गुलाबी बोंड अळीचे नवे संकट आले आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे व त्यांच्या पथकांनी कळमना येथील शेतकरी सुधाकर पिंपळशेंडे, मदन वाढई, कवडू पिंगे, अंतरगाव येथील नितीन पोडे, भारत मोहीतकर, गाडेगाव विशाल पावडे, सोनुर्ली दिलीप बांडोलकर यांच्या शेतावर जावून पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.
धानावर करपा आणि तुडतुडाचा प्रादूभार्व
वढोली : गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यात धानपिकावर करपा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच उर्वरीत पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करुन मार्गदर्शन केले. कडाकरपा या रोगाचा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझॉल २०.४, ॲझोझायस्ट्रिबीन ६.८ हे २० मिली किंवा ट्रायसायक्लोझॉल ४५ टक्के, हेक्सॉकोनाझाल १० टक्के दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारणी कराव्यात, यामध्ये १ ग्रम स्टेप्टोसायक्विन मिसळावे, असे आवाहन कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे