व्हाॅल्वचा तो खड्डा ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:32+5:302021-03-13T04:51:32+5:30

नागभीड : येथील मध्य वस्तीत जुन्या गो.वा.महाविद्यालच्या बाजूलाच वर्दळीच्या रस्त्यावर असलेला खड्डा धोकादायक ठरत आहे. नगर परिषदेने हा खड्डा ...

That pit of the valve is becoming dangerous | व्हाॅल्वचा तो खड्डा ठरतोय धोकादायक

व्हाॅल्वचा तो खड्डा ठरतोय धोकादायक

Next

नागभीड : येथील मध्य वस्तीत जुन्या गो.वा.महाविद्यालच्या बाजूलाच वर्दळीच्या रस्त्यावर असलेला खड्डा धोकादायक ठरत आहे.

नगर परिषदेने हा खड्डा बुजवून किंवा झाकण लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

नगर परिषदेने या खड्ड्याची निर्मिती नळयोजनेच्या पाईप लाईनला व्हाॅल्व लावण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी केली आहे. नगर परिषदेचे कर्मचारी रोजच हा व्हाॅल्व सुरूही करतात. मात्र आता या व्हाॅल्वसाठी तयार करण्यात आलेला खड्डा नागरिकांसाठी धोकादायक बनत चालला आहे.

हा खड्डा ऐन चौरस्त्यावर आहे. उल्लेखनीय बाब ही की मध्य वस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी आहे. या खड्ड्यात नुकतेच दोन-चार अपघात झाले आहेत. नगर परिषदेने या खड्ड्यावर झाकण लावावे, अशी मागणी आहे.

Web Title: That pit of the valve is becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.