खड्डयांची बनली डबकी, चिखलाची झाली घसरपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:56+5:302021-07-24T04:17:56+5:30

छायाचित्र माजरी : वरोरा - वणी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चौपदरीकरणाचे ...

The pits became puddles, the mud became slippery | खड्डयांची बनली डबकी, चिखलाची झाली घसरपट्टी

खड्डयांची बनली डबकी, चिखलाची झाली घसरपट्टी

Next

छायाचित्र

माजरी : वरोरा - वणी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण राहिलेल्या ठिकाणी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्डयांची डबकी झाली आहेत, तर चिखलामुळे घसरपट्टी तयार झाली आहे. स्थानिकांना मार्ग शोधताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

उल्लेखनीय, पाटाळा, राळेगाव, नागलोन, कुचना या मार्गावर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात घडत आहेत. आता महामार्गाचे काम करणारा कंत्राटदार कासवगतीने काम करीत आहे. अशातच सुरू असलेल्या पावसाने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यात पाणी साचले असून डबकी तयार झाली आहेत. पाटाळा, राळेगाव, नागलोन, कुचना मार्गावर दोन्ही बाजूने काम सुरू असल्याने रस्ता अरुंद बनला आहे. या रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठीण बनले आहे.

कोट

चौपदरीकरणाचे कार्य प्रगतीवर आहे. प्रवाशांचा त्रास लक्षात घेता, लवकरच एका बाजूचा रस्ता पूर्ण करून प्रवाशांकरिता सुरू करण्यात येईल.

- राजेश शर्मा, प्रकल्प व्यवस्थापक, अग्रवाल कंपनी.

230721\img-20210723-wa0083.jpg

पावसा मुळे जागो जागी खड्डे आणि चिखल रोड ची दुर्दशा

वरोरा-वणी चौपदरीकरणाच्या कामांमुळे सर्वसामान्यांचा जिव धोक्यात

Web Title: The pits became puddles, the mud became slippery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.