एसटी चालकांना बक्षीस देण्याची योजना संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:13+5:30

एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत.

Plan to reward ST drivers terminated | एसटी चालकांना बक्षीस देण्याची योजना संपुष्टात

एसटी चालकांना बक्षीस देण्याची योजना संपुष्टात

Next
ठळक मुद्देमहामंडळाचे निर्देश : अपघातविरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना मिळत होता सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांना पूर्वी २६० दिवस अपघात विरहित सेवा दिल्यानंतर बक्षीस देण्याची योजना महामंडळाकडून राबविण्यात येत होती. आता ही योजना बंद करण्यात आली असून सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.
एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत. एसटी महामंडळाकडून २६० दिवस अपघात विरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. एसटी चालकांना १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला हे बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जात होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.
लॉकडाऊनमुळे एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाल्याने खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे ही अपघात विरहित बक्षीस योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एसटीच्या चालकांना बक्षीेस देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊनचा महामंडळाला जबर फटका
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले. संचारबंदीही लागू केली. त्यामुळे सर्वच उद्योग, आस्थापना, राज्यसीमा, जिल्हासीमा बंद झाल्या. दळणवळणही बंद झाले. एसटी प्रवासातून कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा घटक असलेली व सर्वांच्या जिवाभावाची लालपरी २३ मार्चपासून डेपोत बंदीस्त झाली. तब्बल अडीच महिने बससेवा बंद राहिली. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. आता बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाश्यांची मर्यादा आहे. शिवाय अनेकजण बसप्रवास टाळत असल्याने महामंडळ तोट्यातच आहे.

Web Title: Plan to reward ST drivers terminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.