तिसरी लाट गृहित धरून नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:41+5:30
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फॅसिलिटी अॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करावी. पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्यासाठी जागा पाहून ठेवावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना नसली, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तयारीत राहावे. औषधी, मनुष्यबळ, आरोग्य तपासणी, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड्सचे नियोजन आतापासूनच करून ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोविडविषयक आढावा बैठकीत गुरुवारी दिले.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मुख्याधिकारी विजय सरनाईक व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फॅसिलिटी अॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करावी. पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्यासाठी जागा पाहून ठेवावी. तसा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जिल्ह्यात नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम यशस्वी झाली. ही मोहीम सुरू करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. यावेळी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची व्हिसीव्दारे संवाद साधला.
२० मे रोजी पंतप्रधान घेणार आढावा
पंतप्रधान देशभरातील जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सादरीकरण करताना डिस्चार्ज रूग्ण, दैनंदिन बाधित रूग्ण, मृत्यू, अॅक्टिव्ह रूग्ण, आरटीपीसीआर, अँटिजेन तपासणी, आयएलआय व सारी रूग्णांची माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.