लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:18 AM2019-05-20T00:18:40+5:302019-05-20T00:21:04+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात बैठक घेण्यात आली.

Planning meeting for the Lok Sabha election counting | लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नियोजन बैठक

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नियोजन बैठक

Next
ठळक मुद्देप्रशासन सज्ज : मतमोजणीत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात बैठक घेण्यात आली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी अधिकारी व कर्मचाºयांना मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे सादरीकरण केले. सुरक्षा व्यवस्था, टपाली मतपत्रिकांची गणना, मतमोजणी व्यवस्था, व्हीव्हीपॅट मतमोजणी, मतमोजणी कक्ष संरचना, मतमोजणी कक्षात वावरताना घ्यावयाची काळजी, निवडणूक निकालाची प्रसिद्धी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी सभागृहात १४ टेबल राहणार आहेत. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचा मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. मतमोजणी सूक्ष्म निरीक्षण, मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्याकरीता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. प्रत्येक सभागृहाकरिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान दोन कंट्रोल युनिटची रँडम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात. निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पूनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी एस. भुवनेश्वरी, निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Planning meeting for the Lok Sabha election counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.