बल्लारपूर पालिकेने केलेले वृक्षारोपण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:46+5:302021-05-22T04:26:46+5:30
जागा मध्य रेल्वेची : वृक्षलागवड नगर परिषदेची बल्लारपूर : वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच माणसाच्या ...
जागा मध्य रेल्वेची : वृक्षलागवड नगर परिषदेची
बल्लारपूर : वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठीदेखील अत्यंत उपयुक्त आहे. आता कोरोना काळात तर ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धनाची गरज भासू लागली आहे. अशातच नगर परिषदेने केलेले वृक्षारोपण बेपत्ता झाले आहे.
दीड वर्षाआधी म्हणजे २०१९-२० या वर्षात वृक्षलागवड या योजनेंतर्गत नगर परिषद व मध्य रेल्वेच्या सौजन्याने १४ व्या वित्त आयोगांतर्गत नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने (बीटीएस प्लॉट) शिवाजी वॉर्डाकडून कॉलरीपर्यंत नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूने अनेक ठिकाणी मध्य रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. सभोवताली मजबूत तारांचे कुंपणही करण्यात आले; परंतु किती वृक्षारोपण झाले याची माहिती सूचना फलकावर लिहिण्याचे नगर परिषद विसरली. इतकेच नाही तर नगर परिषदने लावलेल्या वृक्षांचे संवर्धन नगर परिषद करीत आहे, असे बोर्डवर नमूद आहे. काही वृक्षांचे संगोपनही झाले आहे; परंतु काही जागांवर जाऊन लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्यात आली, तेव्हा तेथील मैदान सपाट दिसले. यासंदर्भात बांधकाम विभागात विचारणा केली असता तेथील लिपिक याबाबत आपणाला माहिती नसल्याचे सांगतो. प्रत्यक्षात वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी वृक्षच नाहीत.