तेलंगणा वनविभागाकडून महाराष्ट्राच्या जमिनीवर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:18+5:302021-08-01T04:26:18+5:30
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा ...
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या कचाट्यात १४ गावे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रची असल्याचा आणि ही जमीनही महाराष्ट्र राज्यात महसुली मध्ये असल्याचा निर्वाळा दिला असला तरी तेलंगणा सरकार या गावात अनेक योजना पुरवत असते. ही जमीन २०१७-१८ पर्यंत महाराष्ट्र वनविभागाची होती आणि त्यानंतर ही जमीन तेलंगणा वनविभागाकडे गेलीच कशी, असा प्रश्न आहे. त्यातच आता ही जमीन महसुली मध्ये महाराष्ट्र आणि वनविभागात तेलंगणामध्ये गेली. मग महाराष्ट्र सरकार अजूनही झोपेचे सोंग का घेत आहे, असा सवाल विचारला जात आहे. मागील वर्षी याच गावात तेलंगणा वनविभागाने शेतीची मोजणी केली आणि शुक्रवारपासून मुकदमगुडा येथील जंगलाच्या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावत आहेत. तेलंगणा वनविभागाकडून ही जमीन आमच्याच राज्याची आहे असे सांगत या जमिनीवर नेहमीच काही ना काही योजना राबवत असतात. मात्र महाराष्ट्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
310721\img-20210731-wa0014.jpg
झाडे लावताना तेलंगणा राज्याचे अधिकारी.