कोरोनामुळे मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:05+5:302021-07-11T04:20:05+5:30
सावरगाव: त्रिशरण एन्लार्मेंट फाउंडेशन पुणेव्दारा विकास दूत प्रकल्पाअंतर्गत ‘एक आठवण आपल्या दारी’ हा उपक्रम नागभीड तालुक्यातील जनकापूर ...
सावरगाव: त्रिशरण एन्लार्मेंट फाउंडेशन पुणेव्दारा विकास दूत प्रकल्पाअंतर्गत ‘एक आठवण आपल्या दारी’ हा उपक्रम नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे शनिवारी जिल्हा समन्वयक संदीप सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.
यात करोना या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ ‘एक आठवण आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये मनोहर विश्वनाथ बोरकर व जिजाबाई कवडू लोणारे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या घरासमोर त्यांच्या कुटुंबीयांसमवेत कडुलिंब आणि आंबा या दोन झाडांची लागवड करण्यात आली. त्यावेळी विकासदूत नागभीड तालुका समन्वयक सचिन कालेस्पोर, ग्रामविकास दूत राहुल रामटेके, ग्रामविकास दूत देवता सूर्यवंशी, मंगेश अशोक बोळेवार, मृतकाचा मुलगा विनोद मनोहर बोरकर, जिजाबाई मनोहर बोरकर, आशा सेविका दीक्षा मेश्राम, अंगणवाडी सेविका बेबीताई बोरकर उपस्थित होत्या.