प्लाज्मा दान व रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:11+5:302021-05-21T04:29:11+5:30
बल्लारपूर :कोरोना महामारीच्या परिस्थितीत ब्लॅड बँकेत रक्ताचा तुटवडा असतो व प्लाज्मा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला जीवनदान देण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते. ...
बल्लारपूर :कोरोना महामारीच्या परिस्थितीत ब्लॅड बँकेत रक्ताचा तुटवडा असतो व प्लाज्मा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला जीवनदान देण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब बल्लारपूर व श्री कच्छ कडवा पाटीदार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने अँटीबॉडी प्लाज्मा दान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
साईबाबा देवस्थान सभागृहात आयोजित या शिबिरात एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सात जणांनी प्लाज्मा दानसाठी चाचणी केली व नाव नोंदणी केली. या शिबिरात चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे पंकज पवार, उत्तम सावंत, लक्ष्मण नगराळे यांनी रक्तसंग्रह व तपासणीची जबाबदार सांभाळली. सदर शिबिर रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मेनेवार व पाटीदार समाजाचे अध्यक्ष रमेश पटेल व प्रकल्प निर्देशक उत्तम पटेल व राहुल वरु यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.