मनपाची प्लास्टिक जप्ती मोहीम प्रारंभ
By admin | Published: April 4, 2017 12:44 AM2017-04-04T00:44:07+5:302017-04-04T00:44:07+5:30
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध भागात व रोडवर खर्रा खाऊन पन्नी रोडवर फेकणाऱ्यांवर व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दंड वसूल : खर्रा विकणाऱ्या ३७ पानठेल्यांवर कारवाई
चंद्रपूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध भागात व रोडवर खर्रा खाऊन पन्नी रोडवर फेकणाऱ्यांवर व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील पानठेल्यांवर खर्रा पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेवाल्यांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना पन्नी बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका सफाई विभाग, झोन क्रमांक २ (अ) अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील पानठेले तसेच पन्नी विक्रेत्यांकडून खर्रा बांधून देण्यात येणाऱ्या पन्न्या जप्त करून ३७ पानठेले व पन्नी विक्रेत्यांकडून ५ हजार ७२० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाही आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, सहा. आयुक्त अश्विनी गायकवाड व प्रभारी प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे यांचे निर्दशनानुसार भूपेश गोठे, स्वच्छता निरीक्षक व सहायक गणपत सातपुते यांच्या पथकाने केली. खर्रा पन्नी मध्ये बांधून न देता कागदामध्ये किंवा इतर वस्तुमधून देण्यात यावे अन्यथा मनपातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी पानठेलेवाल्यांकडून पन्नीमध्ये खर्रा विकत घेऊ नये व मनपातर्फे राबवित असलेल्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
बंगाली कॅम्पमध्ये कारवाई
झोन क्रं. ३ बंगाली कॅम्प अंतर्गत येणाऱ्या प्रभागात प्लॉस्टिक जप्ती मोहीम कार्यवाही सुरू करण्यात आली. ही कार्यवाही प्रभागातील छोटे मोठे दुकाने, पान ठेले, फळ विक्रेता, उपहारगृह, टी स्टॉलवर करण्यात आली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टीक पन्नी जप्ती करण्यात आलेले आहे. यावेळी २२ दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यात ३ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी सुभाष ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात बेनेहर जोसेफ, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदिप मडावी, मुख्य स्वच्छता निरीक्षक, फारूख अहेमद आदी सहभागी होते.