खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:13 PM2018-04-13T23:13:27+5:302018-04-13T23:13:27+5:30

शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़

Plastics ban from Kharar foil removal | खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

Next
ठळक मुद्देनगर परिषद : शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावू नका

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़
खर्रा पन्नी ही स्वच्छतेच्या मार्गातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे़ त्यामुळे यावर शंभर टक्के नियंत्रण आणण्यासाठी न.प. द्वारे विशेष पथक तयार केले, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली़ जनजागृती सुरु असून नव्या दमाने अंमलबजावणी केली जात आहे़ राज्य सरकारने बंदी घातल्याने घरात असलेला प्लॉस्टिकचा साठा नागरिक भितीपोटी न.प.कडे जमा करीत असल्याचे दिसून येत आहे़

जुन्या वस्तुंना येणार ‘अच्छे दिन’
काळानुरुप कोणत्या व्यवसायाला ‘अच्छे दिन‘ केव्हा येतील सांगता येत नाही. प्लॉस्टिक बंदीमुळे नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला आहे. लग्नात वापरण्यात येणाऱ्या प्लॉस्टिक थर्माकोल प्लेटऐवजी पळस, कुकडी पानाच्या पत्रावळी व द्रोण वापरण्याचे वापर प्रमाण वाढू शकते़ किराणा दुकानात प्लॉस्टिकऐवजी कागदाच्या पुड्यांचा वापर वाढू शकतो़ कापड दुकानातील प्लॉस्टिक वापरणे बंद झाल्यास कापडी थैल्यांना चांगले दिवस येतील़ प्लॉस्टिकमुळे पर्यावरण व मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे़ त्यामुळे जुन्या काळातील वस्तु वापरण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास काही व्यवसायाला ’अच्छे दिन’ येण्यास वेळ लागणार नाही़

खर्रा पन्नी मोठी समस्या
प्लॉस्टिक बंदी झाल्यास खर्रा पन्नीची सर्वात मोठी समस्या निर्माण होणार आहे. शहरात सर्वाधिक प्लॉस्टिक खर्रा पन्नीमुळे पसरला अशी माहिती महिलांनीच कार्यशाळेत दिली़ त्यामुळे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे़

कर्करुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ
प्लास्टिकवर रसायन टाकूनही जमिनीत विरघळत नाही़ ते प्लॉस्टिक पोटातही विरघळत नाही़ प्लॉस्टिकसहीत अन्य घटकांमुळे कर्करोगींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्लॉस्टिक शरीराच्या आत गेल्यानंतर विघटनाच्या क्रिया बिघडते़ अपचनीय असल्याने एकाच ठिकाणी राहते. विविध प्रक्रिया घडून पेशींमध्ये अनिष्ट बदल होतात़ यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे़ त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर टाळणे बंद करण्याची गरज आहे़ पर्यावरणावरही याचा दुष्परिणाम होतो. खर्रा घासण्याच्या प्रक्रियेत पन्नीचा वापर होतो. त्या पन्नीचे कण पोटात जातात त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.
- डॉ. विवेक शिंदे,
भद्रावती.

महिलांकडून जनजागृती
महिला बचतगटांद्वारे प्लॉस्टिक बंदीविषयी जनजागृती केली जात आहे़ उन्नती बचत गटाच्या महिलांनी नागरिक तसेच व्यावसायिकांना जागृतीची पत्रके वाटली. येत्या तीन दिवसांत विविध महिला बचत गटांद्वारे जनजागृती मोहीम गतिमान केली जाणार आहे़

शासनाच्या सगळ्या योजना राबविण्यात भद्रावतीकर अग्रेसर आहेत. प्लॉस्टिक बंदीबाबत सुद्धा भद्रावतीकर सहकार्य करतील, अशी पालिकेला मला खात्री आहे.
- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष,
न.प. भद्रावती

Web Title: Plastics ban from Kharar foil removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.