ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी घरावर लावल्या अशाही पाट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:35 PM2019-12-07T16:35:33+5:302019-12-07T16:38:06+5:30

२०२१मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहीमच संविधान दिनापासून उघडली आहे.

Plates that are also installed on the house for the independent census of OBCs | ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी घरावर लावल्या अशाही पाट्या

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी घरावर लावल्या अशाही पाट्या

Next

चंद्रपूर : २०२१मध्ये होणा-या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या घरावर लावण्याची मोहीमच संविधान दिनापासून उघडली आहे. ही मोहीम त्यांनी आपल्या घरापासून सुरू केलेली आहे. या मोहिमेचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातही पसरले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या घरासमोर सदर आशयाच्या पाट्या लावून जनगणना २०२१मध्ये ओबीसी जनगणनेच्या कॉलमची मागणी केली आहे.

ही मोहीम सुरू करतानाच समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाकडे संसद अधिवेशनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी संबंधित खासदारांना ओबीसी संघटनांनी निवेदन देण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्यासह अन्य तालुक्यातील काही घरांवर ‘जनगणना २०११ मध्ये सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमुळे ओबीसी जनगणनेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. असे असताना केंद्र सरकारने २०२१च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर करीत प्रक्रियाही सुरू केलेली आहे. या विरोधात अ‍ॅड. अंजली साळवे-विटणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेऊन मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना २०२१ ला आव्हान दिले आहे हे विशेष.

Web Title: Plates that are also installed on the house for the independent census of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.