जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म तिकीट जैसे-थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:25+5:302021-09-18T04:30:25+5:30

बॉक्स अद्यापही निर्देश नाही सध्यस्थितीत विशेष रेल्वे धावत आहे. त्यामुळे स्थानकावर पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यातच तिकीट ...

Platform tickets at railway stations in the district are as-is | जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म तिकीट जैसे-थे

जिल्ह्यातील रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्म तिकीट जैसे-थे

Next

बॉक्स

अद्यापही निर्देश नाही

सध्यस्थितीत विशेष रेल्वे धावत आहे. त्यामुळे स्थानकावर पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यातच तिकीट ३० रुपये असल्याने अनेकजण स्थानकावर जाणे टाळत होते, परंतु आता प्लॅटफाॅर्म तिकीट ३० रुपयांवरुन दहा रुपये करण्यात आले आहे. परंतु याबाबत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आम्हाला कुठलेही निर्देश मिळाले नसल्याने तिकीट ३० रुपये असल्याची माहिती दिली.

बॉक्स

वर्षभरापासून ३० रुपयांचा भुर्दंड

रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकीट दहा रुपयांवरुन ५० रुपये केले होते; मात्र याबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात ओरड होत होती. त्यानंतर रेल्वे तिकीट ३० रुपये करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील स्थानकावरील प्लॅटफाॅर्म तिकी ही ३० रुपयेच आहे; मात्र इतर जिल्ह्यात प्लॅटफाॅर्म तिकीट पूर्ववत करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातही प्लॅटफाॅर्म तिकीट दहा रुपये करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बॉक्स

सुरु असलेल्या ट्रेन

तामिळनाडू एक्स्प्रेस

एपी एक्स्प्रेस

सेवाग्राम एक्स्प्रेस

केरला एक्स्प्रेस

विदर्भ एक्स्प्रेस

संघमित्रा एक्स्प्रेस

सिकंदराबाद एक्स्प्रेस

Web Title: Platform tickets at railway stations in the district are as-is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.