झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:02 AM2017-11-30T00:02:03+5:302017-11-30T00:02:55+5:30

झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत.

To play the role of shrimp play, it is a challenge | झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

झाडीपट्टी नाटकातील भूमिका साकारणे, हे आव्हानच

googlenewsNext
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : मराठी कलावंताची ‘लोकमत’शी बातचित

राजकुमार चुनारकर।
आॅनलाईन लोकमत
चिमूर : झाडीपट्टी नाटकांना शंभर वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा झाडीपट्टीतील कलावंत आजही जोपासत आहेत. तुम्ही कुठेही काम करीत असाल तर तुम्हाला कलाकार म्हणून स्वत:ला तपासणे गरजचे आहे. चित्रपटांमध्ये तशी संधी राहत नाही. कारण सिनेमामध्ये ‘रिटेक’ असतो. मात्र नाटकात अखंड काम करावे लागते व नाटकात रिटेक नसतो. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकात भूमिका साकारणे हे कलाकारांपुढे आव्हान असते, असे मत मराठी सिनेमातील कलावंत मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
चिमूर तालुक्यातील नेरी येथे आयोजित ‘गद्दार’ नाटकात ‘नाम्या’ ची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली होती. नाटकाच्या मध्यंतरात त्यांना गाठून त्यांची प्रस्तुत प्रतिनिधीने बातचित केली. मराठी चित्रपटसृष्टीत व ‘नाम फाऊंडेशन’ संस्थेच्या कार्याने पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे मकरंद अनासपुरे म्हणाले, सगळ्याच भागातील चित्रपट बनले आहेत. आता झाडीपट्टीतील विषयांवर चित्रपट बनायला हवा. झाडीपट्टी रंगभूमीतील अडचणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार आहे व मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने ते झाडीपट्टीला न्याय देतील. सगळ्याच ग्रामीण भाषेत गोडवा आहे. त्यामुळे ती भाषा मंचावर येणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकºयांच्या समस्या राहणार नाही व आत्महत्याही होणार नाही. सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही.
त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकरीही स्वाभिमानी आहेत. गरज नसल्यास ते कर्ज घेत नाही. मात्र परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज घेतो व कर्जापायी आत्महत्या करतो.
मात्र सामाजिक बांधीलकी म्हणून ‘नाम’ फाऊंडेशनद्वारे शेतकºयांसाठी काही प्रमाणात काम केले जात आहे. नाम फाऊंडेशन कुणावर टिका किंवा प्रसिद्धीसाठी काम करीत नाही. नाम फाऊंडेशन शेतकरी, विधवा, वीर सैनिकांसाठी काम करते. त्यामध्ये शेतकºयांना १५ हजार तर शहीद सैनिकांना २ लाख ५० हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.
‘नाम’ द्वारे जलसंघटनांचेही कामे केली जात आहेत. १२८ गावात नद्या, तलाव, कालवे खोलीकरणाचे काम केलेत.
नक्षलग्रस्त गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा नाम फाऊंडेशनचे काम सुरू करणार आहोत. सगळ्यांनी माणुसकीचा विचार केल्यास या संघटनांना काम करण्याची गरज भासणार नाही. मात्र ‘आपलं पोट भरलं ना, मग दुसºयांचा विचार का करायचा’, अशी मानसिकता समाजात असल्याची खंतही मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.
झाडीपट्टीत मागच्या जानेवारीपासून येण्यास सुरूवात केली. झाडीपट्टीत मोठे कलाकार आहेत. कलाकारांनी कलेचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. संधी मिळावी म्हणून जो धडपडतो, तो कला क्षेत्रात टिकतो, असेही मकरंद यांनी सांगितले.

Web Title: To play the role of shrimp play, it is a challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.