चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:53 PM2017-09-07T23:53:42+5:302017-09-07T23:56:48+5:30
राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी .....
लोकमत न्यूज नेटवर्क
सुब्बई : राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी सकाळी १० वाजेपर्यंत दवाखान्यात पोहोचलेच नाही. याशिवाय दवाखान्यात एकही कर्मचारी व नर्सही दिसून आली नाही. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, या केंद्रात उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाºयांना तसा नियुक्ती आदेशच नसल्याची माहिती समोर आली.
गुरुवारी रुग्ण कल्याण समितीने दवाखान्यात भेट दिली असता सकाळी १०.३० च्या सुमारास डॉ. अहीरकर हे दवाखान्यात पोहचले. परंतु रुग्णांना सेवा देण्याकरिता ते असमर्थ ठरले. कारण या आरोग्य केंद्रात तेव्हा एकही कर्मचारी व नर्स उपस्थित नव्हते. नंतर परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने उशिरा येण्याचे कारण विचारले असता एक मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली. डॉ.अहीरकर यांनी सांगितले की त्यांना या दवाखान्याचा नियुक्ती आदेश नाहीे. उपचारदरम्यान रुग्ण दगावल्यास त्याची जबाबदारी आपली नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही. त्यांच्या या धक्कादायक उत्तराने नागरिक व समितीचे सदस्य चांगलेच संतापले. कर्मचारीही दवाखान्यात राहून कर्तव्य न बजावता क्वॉर्टरमध्ये असतात.