सरकारी धान्य गोदामाची दुर्दशा; पालिकेकडे हस्तांतरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:12+5:302021-08-24T04:32:12+5:30

गडचांदूर : औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर येथे सरकारी धान्य ठेवण्याकरिता गोडाउन असून, मागील अनेक वर्षांपासून पडून आहे. उपयोग होत ...

The plight of government grain warehouses; Demand for transfer to the municipality | सरकारी धान्य गोदामाची दुर्दशा; पालिकेकडे हस्तांतरणाची मागणी

सरकारी धान्य गोदामाची दुर्दशा; पालिकेकडे हस्तांतरणाची मागणी

Next

गडचांदूर : औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर येथे सरकारी धान्य ठेवण्याकरिता गोडाउन असून, मागील अनेक वर्षांपासून पडून आहे. उपयोग होत नसल्यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून, गोडाउनची दुर्दशा झालेली आहे.

गोडाउन शहरात असल्यामुळे नगर परिषदेच्या विकास कामात येण्याच्या दृष्टीने शासनाने नगर परिषदेकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे.

कोरपना तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरित होणारे धान्य तहसील येथील गोदाममधून जात असते. तालुक्यात सरकारी धान्य ठेवण्याकरिता कोरपना व गडचांदूर येथे गोडाउन आहे. शासनाच्या धोरणानुसार फक्त तालुक्याच्या ठिकाणी धान्य गोदाम राहील. त्यामुळे गडचांदूर येथील साठवलेले सर्व धान्य जिवती व कोरपना तालुक्याच्या गोदामामध्ये पाठवण्यात आले. तेव्हापासून ते गोदाम दुर्लक्षित आहे. त्याचा उपयोग दुसऱ्या कोणत्याही कामाला होत नाही आहे. शासनाचेसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीने शहरातील सर्वसामान्य नागरिकांकरिता बिर्ला हॉल कमी शुल्क घेऊन सार्वजनिक समारंभाकरिता उपलब्ध करून देत होते; परंतु नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगर परिषदेचे कार्यालय बिर्ला हॉल येथे गेल्यामुळे नागरिकांना शहरात कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक हॉल उपलब्ध नाही. सर्वसामान्य नागरिकांना कमी शुल्कामध्ये सार्वजनिक समारंभाकरिता हॉल उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने हस्तांतराचा ठराव घेऊन मागणी केलेली आहे.

कोट

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक समारंभाकरिता कमी शुल्कामध्ये सभागृह उपलब्ध व्हावे, याकरिता नगर परिषदेने शासनाकडे पडून असलेल्या सरकारी धान्य गोदामाची मागणी केलेली आहे.

- सविता टेकाम, अध्यक्ष, न. प. गडचांदूर.

230821\img_20210823_140026.jpg~230821\img_20210823_140204.jpg

पडीत असलेले गोडाऊन~गोडाऊन समोरील परिसराची दुर्दशा

Web Title: The plight of government grain warehouses; Demand for transfer to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.