जड वाहतुकीमुळे माथरा-साखरी रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:58+5:302021-09-02T04:59:58+5:30
राजुरा ते कवठाळा आणि माथरा ते साखरी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणार आहे. वेकोलीने नियम पायदळी तुडवून सर्रास ...
राजुरा ते कवठाळा आणि माथरा ते साखरी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणार आहे. वेकोलीने नियम पायदळी तुडवून सर्रास जड वाहतूक करीत आहे. हा रस्ता वळविण्यासाठी वेकोलीचे प्रयत्न असून जनतेला अधिक फेरा मारून जावे लागणार आहे. एकीकडे बांधकाम विभागाचे रस्त्यांचे नुकसान दुसरीकडे जनतेला त्रास होत असताना वेकोली रस्त्याची डागडुगीदेखील देखील करत नाही. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पाणी मारले जात नाही. या परिसरात वेकोलीने मोठ्या प्रमाणात शेतजमीन संपादित केली. कोळसा खाणी सुरू केल्या. मात्र जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा केली. पाण्याची पातळी खोल गेली. नदी नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलले. यामुळे पुराचा धोका वाढला. प्रदूषण वाढले. कंत्राटी खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार देत नसल्यामुळे बेरोजगारी कमी झाली नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी केला आहे.