मोहाडी ते बोथली राज्यमार्गाची दैना

By admin | Published: November 20, 2014 10:48 PM2014-11-20T22:48:26+5:302014-11-20T22:48:26+5:30

तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा ते मोहाडी व मोहाडी ते बोथली पर्यंतच्या रस्त्याची ऐसीतैसी झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षभरात लाखो रूपये

The plight of the Mohali road from Mohali to Botha | मोहाडी ते बोथली राज्यमार्गाची दैना

मोहाडी ते बोथली राज्यमार्गाची दैना

Next

सिराज शेख - मोहाडी
तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील खापा ते मोहाडी व मोहाडी ते बोथली पर्यंतच्या रस्त्याची ऐसीतैसी झालेली असून जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वर्षभरात लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र भ्रष्टाचाराच्या कीड्याने हा रस्ता कुरतडून परिस्थिती ‘जैसे थे’ केली आहे.
तुमसर भंडारा राज्य मार्गाची देखभाल दुरूस्तीची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी यांच्याकडे आहे. या उपविभागाकडे तुमसर ते वरठी पर्यंतचा रस्ता येतो. तसेच मोहाडी तालुक्यातील इतरही काही डांबरी रस्ते या उपविभागाकडे आहेत. मात्र सारेच रस्त्यांची परिस्थिती एकसारखी आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडी येथील सहायक अभियंता विजया सावरकर या नेहमी दोऱ्यावर किंवा मिटींगमध्ये व्यस्त असतात. कार्यालयात कधीकाळच दिसतात. त्यांच्या दौऱ्याचा व मिटींगचा किती फायदा रस्ते विकासासाठी झालेला आहे याचे उत्तर त्यांनाच माहित. या राज्य मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. प्रवाशांना व वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून चालावे लागते.
दोन वर्षापुर्वीच वरठी ते मोहाडी पर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता सहा महिन्यातच उखडला. तेव्हापासून या रस्त्याची दुरावस्था होत आहे. तुमसरपासून ते वरठी पर्यंतच्या रस्त्याची अनेक वेळा डागडुगुजी करण्यात आली. मोठमोठे खड्डे गिट्टी व डांबराच्या मिश्रणाने बुजविण्यात आले. मात्र कमी दर्जाचा डांबर वापरत असल्याने बजुविलेले खड्डे महिन्या भरातच उखडतात. आताही काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. एकच काम अनेकवेळा करण्यात मोहाडीचे बांधकाम विभाग पटाईत असल्याचे जाणवते. जनतेच्या कराचा पैसा असा वाया घालविला जात आहे.

Web Title: The plight of the Mohali road from Mohali to Botha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.