अंबुजा गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:33 PM2018-11-27T22:33:01+5:302018-11-27T22:33:19+5:30

प्रकल्प शेतकरी व आदिवासींच्या हक्कासाठी पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंबुजा गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. साखळी उपोषणेकरिता शहरातील पेट्रोलपंप चौकात सोमवारी मंडप टाकण्यात आला होता. ही सर्व तयारी पाहून पोलीस विभागाचा गोंधळ उडाला.

Plot of Project Crisis in front of Ambuja Gate | अंबुजा गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

अंबुजा गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : प्रकल्प शेतकरी व आदिवासींच्या हक्कासाठी पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंबुजा गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.
साखळी उपोषणेकरिता शहरातील पेट्रोलपंप चौकात सोमवारी मंडप टाकण्यात आला होता. ही सर्व तयारी पाहून पोलीस विभागाचा गोंधळ उडाला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी पाच वाजता अचानक कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
मागील दहा महिन्यांपासून चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात अंबुजा सिमेंट कंपनीमुळे प्रकल्पबाधित आदिवासी व इतर शेतकरी तसेच पगडीगुड्डम धरण प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी आंदोलन केले होते. तीन महिन्यांपूर्वी अंबुजाच्या प्रकल्पबाधित बेरोजगारांनी तब्बल ६० दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. देशमुख यांनी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी साठ किलोमीटरची पदयात्राही काढली होती. या आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांनी दोन महिन्यात कंपनीच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण कारवाईच झाली नाही. मंगळवारी देशमुख यांनी अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. कंपनीमध्ये सकाळच्या पाळीला जाणारे कामगार व सिमेंटचे ट्रक रोखण्यात आले. प्रकल्पबाधित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला.
- सुशीलकुमार पानेरी, युनिट हेड अंबुजा सिमेंट, गडचांदूर.

Web Title: Plot of Project Crisis in front of Ambuja Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.