नदी पात्रात पालिकेकडून नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:53 AM2019-05-15T00:53:47+5:302019-05-15T00:54:08+5:30

चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Plow plowing in river banks | नदी पात्रात पालिकेकडून नांगरणी

नदी पात्रात पालिकेकडून नांगरणी

Next
ठळक मुद्देउमा नदीचे पात्र उथळ : विहिरीचा जलस्तर वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.
चिमूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे जलस्त्रोत कोरडे होत आहेत. परिणामी चिमूर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यात भारनियमनाची भर पडली आहे. शहराला कायमस्वरूपी सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. परंतू त्यानंतर नदीचे खोलीकरण केले नाही. त्यामुळे पुरातील वाळू, मातीमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. पात्रात आता नावालासुद्धा वाळू दिसत नाही. पात्र जमिनीसारखे टणक झाले आहे. त्यामुळे पात्रातील पाणी भूगर्भात जिरत नाही. याचा परिणाम या स्त्रोतावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर झाला आहे. तिथे आता अत्यल्पसाठा उपलब्ध आहे.
शहरातील पाणी टंचाईची स्थिती बघता पात्राच्या खोलीकरणाची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागितली आहे. मात्र, परवानगीची प्रक्रिया किचकट असल्याने त्याला उशीर लागणार आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवी शक्कल शोधली आणि नदीपात्रातील बंधाºयाच्या लगत जवळपास सात मीटर नांगरणी केली. या नांगरामुळे नदीतील गाळाचा मोठा थर बाजूला होईल. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी तलावाचे पाणी सोडण्याची विनंती चिमूर तहसीलदारांना केली आहे. तलावाचे सोडल्यानंतर नदी पात्रात ते जिरेल. यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर वाढेल, या आशेने चिमूर नगरपालिकेने नदी पात्रात नांगरणी केली. सदर प्रकार सर्वांनाच आश्यर्चकारक होता. त्यामुळे प्रकरणाची चिमूर शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

Web Title: Plow plowing in river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.