महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:55 PM2024-04-08T13:55:33+5:302024-04-08T13:56:25+5:30

Chandrapur Lok Sabha: चंद्रपुरातील सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी एक्सवर मराठीमध्ये पोस्ट लिहीत या सभेविषयी भाष्य केलं आहे.

PM narendra Modi criticizes the opposition before chandrapur lok sabha meeting | महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपुरातील मोरवा विमानतळालगत १६ एकर जागेवर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात जाहीर सभेसाठी येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अशातच या सभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी मराठीत एक्सवर पोस्ट लिहीत या सभेविषयी भाष्य केलं आहे.

"महाराष्ट्रातील जनमानसाने लोकसभा निवडणुकीत  भाजपा-एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचा महाप्रण केला आहे," असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राजकीय विरोधकांना डिवचलं आहे. तसंच चंद्रपुरात आज संध्याकाळी ५ वाजता आपल्या प्रियजनांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, आजच्या सभेतून पंतप्रधान मोदी नेमके काय मुद्दे उपस्थित करतात आणि कोणावर निशाणा साधतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कसं आहे सभेचं नियोजन?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी ५ वाजता मोरवा येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात जय्यत तयारी केली आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रशासनाचेही याकडे लक्ष लागलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तसेच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. नरेंद्र मोदी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचार सभेकरिता चंद्रपूरला आले होते. ते त्या वेळी पंतप्रधान नव्हते. त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व त्यानंतर मोदी हे पंतप्रधान झाले. आता जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे राज्यातच नाही तर देशपातळीवरही नाव आहे. त्यामुळेच आजपर्यंत चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात चार पंतप्रधानांनी भेट दिली आहे. काही वेळा त्यांनी प्रचारसभांकरिता तर काही वेळा इतर कार्यक्रमांनाही हजेरी लावली आहे. पंतप्रधान होण्यापूवी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा चंद्रपुरात भेट दिली होती. आता दहा वर्षांनंतर ते पंतप्रधान पदावर असताना चंद्रपुरात येत आहेत.

Web Title: PM narendra Modi criticizes the opposition before chandrapur lok sabha meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.