ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी खासदारांचे पंतप्रधानांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यासोबतच ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी पंतप्रधानांना साकडे घातले.
२०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना होणार आहे. यामधे ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम असावा, ओबीसीची स्वतंत्र जनगनणा होत नसल्याने समाजाला योग्य ते लाभ मिळू शकत नाही आहे. अनेक लोकांनी त्या विरुद्ध आंदोलनात्मक पावित्रा घेतलाय. त्यामुळे ओबीसी बांधवांसाठी स्वतंत्र कॉलम जनगनणेत असावा, अशी मागणी खा.धानोरकर यांनी पंतप्रधानांना भेटून केली.
चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला ऐतिहासिक वारसा आहे. अनेक बौद्ध बांधवांची आस्था याठीकाणी जुळलेली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीच्या विकासासाठी योग्य निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खा. धानोरकर यांनी केली.
सिंचन प्रकल्पासाठी निधी द्यावा
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. निम्न पैनगंगा, वडनेर हे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी विनंती खा. बाळू धानोरकर यांनी पंतप्रधानांना केली. आॅर्डीनंस फॅक्टरीमधील २०५ लोकांनी नोकरीसाठी अर्ज दिले. पण त्यापैकी एकालाही नोकरी मिळू शकलेली नाही. यासंबधी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.
कर्नाटका एम्टा खाण सुरू करा
यावेळी धानोरकर यांनी कर्नाटक एम्टा ही खाण २०१५ पासून बंद आहे. ज्यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहे. ही खाण पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली. तत्कालीन पंंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी भद्रावती तालुक्यात तीन हजार एकर जमीन पावर प्लांटसाठी मंजूर केली. परंतु अजूनही तिथे कोणताही उद्योग सुरु होऊ शकला नाही. तिथे एखाद्या उद्योगाला मान्यता मिळाल्यास स्थानिकांना रोजगार मिळु शकेल. या क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कोळसा खाणीत गेल्या. त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकºया देण्यात याव्या, अशी मागणी खा. धानोरकर यांनी केली.